मुंबई:कोकणदीप मासिकाचा २३ वा वर्धापन दिन मुबंई मराठी ग्रंथ संग्रालय दादर येथे मा.ना.श्री योगेशदादा कदम(राज्यमंत्री गृह (शहरे)यांच्या उपस्थितीत मोठया थाटामाटात संपन्न झाला.यावेळी सामाजिक शैक्षणिक,साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना कोकणदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह्या मंचावर मला (नेहा भगत) सामाजित क्षेत्रात उत्तम काम करत असल्या कारणाने माझा देखिल कोकणदीप पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. तसेच श्री. शशिकांत सावंत(पत्रकार, साहित्यिक),श्री.रविंद्रभाई कालेकर (सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ)यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मंचावर श्री.सुधीरभाऊ कदम(शिवसेना संपर्क प्रमुख -दापोली विधानसभा),डॉ.सुकृत खांडेकर(जेष्ठ पत्रकार,संपादक दैनिक प्रहार),श्री संतोष परब (महाराष्ट्र शासन समाज भूषण पुरस्कार प्राप्त),डॉ.राम मेस्त्री (साहित्यिक),श्री.प्रवीण घाग (गिरणी कामगार नेते),श्री रणजित जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सूत्रसंचालन श्री.प्रसाद महाडिक यांनी केले.


