विषमता आणि भेदभावाबद्दल जागरूकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस असतो पण दररोजच्या जीवनात जर प्रत्येक स्त्रीला सन्मान दिला तरच तो खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन ठरू शकतो.
आजही महिलांना अनेक समस्या भेडसावत आहेत. स्त्री भ्रूणहत्या, घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण, शिक्षणाची कमतरता, दारिद्र्य आणि बेरोजगारी या समस्या महिलांसाठी मोठ्या अडचणी ठरत आहेत. आज प्रत्येक स्त्रीने शस्त्र चालवायला शिकण अत्यंत गरजेच झालं आहे. Reel मधून बाहेर येऊन Real मध्ये जगायला शिकायला हव.
जागतिक महिला दिना निमित माझ्या बरोबर सात महिलांचा सत्कार करण्यात आला ह्यात प्रत्येक स्त्री आपआपल्या क्षेत्रात उंतुग भरारी घेतली आहे आणि स्त्री आत्ता चुल आणि मुल हे सांभाळून आपली प्रगती करतेय.
एवढ्या मोठ्या मंचावर माझे विचार मांडायला प्रहार चे संपादक सुबोध खांडेकर यांनी जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभारी आहे आणि मी आपली नेहमी ऋणी राहील.