नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा अविष्कार आणि सन्मानाचा जागर. निसर्गाने निर्माण केलेला कलेचा सर्वोत्तम नमुना म्हणजे स्त्री. तिचा खंबीरपणा हा पुरुषांहून वरचढ ठरतो. परिस्थिती कशीही असो परिस्थितीला तोंड देते. स्त्री ही प्रसंगी मेणाहून मऊ तर प्रसंगी वज्राहून कठोर होऊ शकते. अशा या स्त्रीचा नवरात्र निमित्त “जागर स्त्री शक्तीचा” हा कार्यक्रम आयोजित केलेला. यात कवित्रीने आपल्या कविता सादर केल्या तसेच आपल्या आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावलेल्या अशा दहा महिला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
उत्सव मूर्ती महिलां नेहा खरे, प्रतिभा सराफ अंजली तळेकर, योगिता प्रभू, क्षमा नाबर, रश्मी शानबाग, शिल्पा शहा, वैशाली वाघधरे, क्रांती हेदवकर,आणि दर्शना आंग्रे यांना शॉल आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आल. तसेच नीलाक्षी मोहिते, उमा रावत, पूजा काळे, प्रतिभा सराफ, स्वाती डांबरी मसूरकर, रश्मी करोडे, प्राची शिंदे, शिवानी गोखले ह्या कवित्रींनी आपल्या रचलेल्या कविता सादर केल्या.
व्यक्त व्हा या एका नावासाठी आशा शेलार चांदुरकर यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित लावणी व कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाला प्रेमापोटी आवर्जून उपस्थित राहिलेले शिक्षण अधिकारी डॉक्टर जिवबा केळुसकर तसेच ज्येष्ठ समाजसेवक, पत्रकार शशिकांत सावंत सर व साहित्यिक, रचनाकार विलास देवळेकर सर.
अतिशय उत्साहात जागृत स्त्री शक्तीचा कार्यक्रम अजितेन जोशी यांच्या सहकार्याने पार पडला.
