17 डिसेंबर 2023 रोजी व्यक्त व्हा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पहिला जेष्ठ नागरिकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. विठ्ठल मंदिर संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आनंदात पार पाडण्यात आला. खास करून हा कार्यक्रम ज्यांच्यामुळे संपन्न झाला ते दादर मधील सुप्रसिद्ध सनातन विठ्ठल मंदिर आणि राष्ट्रीय कीर्तन संस्थेचे अध्यक्ष आणि जनसेवा बँकेचे माजी उच्च पदाधिकारी माधव खरे. अत्यंत शांत निर्मळ आणि सदैव हसत असे माधव खरे यांच्या आशीर्वाद ह्या कार्यक्रमाला लाभले, आणि हा कार्यक्रम अभय सावरकर, ज्ञानराज पाटकर, राजीव जोशी यांच्या उपस्थितीत पार पाडला. ज्यांनी या कार्यक्रमाची सुंदरता वाढवली ते ग्रुप टाईम लिस्ट च्या अस्मिता गडा एचडीएफसी बँकेच्या वाईस प्रेसिडेंट व त्यांची टीम यांचे मनापासून आभार. तसेच महेश गुजर यांनी हे सुंदर क्षण चलचित्रित केले.
परत एकदा मी माधव खरे आणि विठ्ठल मंदिराची समिती यांचे मनापासून आभार मानते.
