आपल्या व्यक्त व्हा या संस्थेचे कार्यच आहे समाजातील संपत चाललेल्या भावनिक संवाद पुनर्जीवित करून आधुनिक कारणामुळे संपत चाललेला मनामना मधील जिव्हाळा पुन्हा जागवणे म्हणून समाजातील हळव्या विषयांना बोलते करून माणूस पण जपण्यासाठी मोबाईल एक व्यसन हा कार्यक्रम पालकांना तसेच विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला गेला.
दि.२४/१/२०२५ रोजी “व्यक्त व्हा”चॅरिटेबल ट्रस्टचा ” मोबाईल एक व्यसन “हा समाजाला पुढील पिढीला घडवताना कोणती सजगता हवी हे प्रबोधन करणारा आगळावेगळा उपक्रम “I.E.S.ऑशलेन “शाळेत उत्तम प्रतिसादात पार पडला.आयोजक “सौ.नेहा भगत व मार्गदर्शक श्री.अजितम जोशी यांच्या उत्तम योगदानातून ,तसेच I.E.S शाळेच्या मुख्याध्यापिका “गितांजली देसाई”मॅडमचे सहाय्य लाभले,तर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक श्री .अमोल मडामे, नर्मदा किडनी फाउंडेशन अध्यक्ष श्री.ज्ञानराज पाटकर ,ज्येष्ठ पत्रकार समाजसेवक साहित्यिक श्री. शशिकांत सावंत या मान्यवरांच्या संवादातून मार्गदर्शन लाभले, तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखिका /कवयित्री आणि निवेदिका “उमा रावते”यांनी पार पाडले.
