सुनिर्मल फाऊंडेशन धारावीच्या वतीने गरीब आणि गरजू विदयार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप!
मुंबई :सुनिर्मल फाऊंडेशनचे संस्थापक कै. सुनिल खंदारे यांच्या स्मरणार्थ धारावीतील गरीब व गरजू विदयार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप शनिवार दि.२१जून रोजी धारावीतील श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल येथे करण्यात आले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी
विलासराव खानोलकर (एस.सी.ओ. आणि मेंबर ऑफ सेन्सर बोर्ड दिल्ली )
राजेशजी खंदारे (सचिव संत कक्कया विकास संस्था )
रेवती आळवे (मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया )
सौ.नेहा भगत(सामाजिक कार्यकर्त्यां )
श्री महादेव शिंदे (धारावी शिवसेना उपविभाग प्रमुख)
प्रा.डॉ. राम मेस्त्री (जेष्ठ साहित्यिक )
श्री रमेश कदम (जेष्ठ समाज सेवक)
श्री शशिकांत सावंत (पत्रकार)
श्री दिलीप गाडेकर (जेष्ठ समाज सेवक)
आदी मान्यवर ममंडळी उपस्थित होती.
त्यांच्या हस्ते धारावीतील २०० विध्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले.धारावीतील या गरजू विदयार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी कुठलीच अडचण येऊ नये म्हणून नवनीत कॉलेजच्या एम डी डॉ.भंसाली मॅडम यांनी मोठी मदत केली.
सुनिर्मल फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवित आहे.याची दखल अनेक संस्था आणि संघटनानी घेतली असून अनेक पुरस्कार देऊन सुनिर्मल फाऊंडेशनचा सन्मान करण्यात आला आहे.
तसेच शालेय वस्तूचे वाटप करण्यासाठी
श्री दिलीप खंदारे (अध्यक्ष सुनिर्मल फाऊंडेशन ), श्री राम म्हस्के (सचिव सुनिर्मल फाऊंडेशन ), श्री शैलेश खंदारे (संस्थापक सदस्य ), श्री परशुराम गजाकोश, श्री मंगेश गायकवाड, श्री ओमकार खंदारे,श्री भावेश खंदारे,श्री मंगेश सोनवणे,सौ पूर्वा खंदारे,सौ.रेखा सदाफुले, अक्षय शिंदे, प्रेरणा खंदारे आदी सभासदानी विशेष मेहनत घेतली तसेच कार्यक्रम यशस्वी रित्या पार धारावी झोपडपट्टी पोलीस पंचायतचे सर्व सभासद यांनी सहकार्य केले.
तसेच संत कक्कय्या विकास संस्था धारावी यांनी विनामूल्य सभागृह उपलब्ध करुन देऊन शालेय वस्तू वाटप कार्यक्रमात आपला खारीचा वाटा उचलला.





